आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील भरड चिंचखेडी रस्त्यावर विनापरवाना अवैध सागाच्या दांड्या वाहतूक करणारी पिकअप वाहनासह अंदाजे १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल वन विभागाच्या कारवाईत जप्त केली. पहाटे वनपाल माकडकुंड, वनरक्षक अट्टी, वनरक्षक धडगाव व रेंज स्टाफ बिलगाव यांच्यासह गुप्त बातमीवरून भरड-चिंचखेडी रस्त्यावर संशयावरून पीकअप वाहन (एमएच ०४, डीएस ८४६१ ची तपासणी केली असता विनापासी, विनाशिक्क्याचे, विनापरवाना अवैध वाहतूक करताना अडवले. वाहनचालक अंधाराचा गैरफायदा घेऊन जंगलात पसार झाला. १,५०,००० वाहन, १५४८६ चे साग दांडी नग २० घ.मी.०.७६५ माल धडगाव टिंबर डेपोत पावतीने जमा केला. वनरक्षक अट्टी एम. एम. वळवी यांनी भारतीय गुन्हा नोंदवला.
ही कारवाई वनसंरक्षक धुळे (प्रा.) विवेक होशिंग, विभागीय वनाधिकारी संजय पाटील, नंदुरबार उपवनसंरक्षक कृष्णा भवर, अक्राणी सहायक वनसंरक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अक्राणी चारुशिला काटे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल माकडकुंड बी. एम. परदेशी, वनरक्षक एम. एम. वळवी, अनिल पाडवी, गुलाबसिंग तडवी, वसंत पटले, संदीप भंडारी, अनिल पावरा, महेंद्र तडवी, वाहनचालक हिंमत पावरा यांनी कारवाई केली. तपास वनपाल भरतसिंग परदेशी करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.