आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यवाही‎:पदवीधर मतदार संघासाठी‎ प्राप्त अर्जांवर कार्यवाही‎

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎१ नोव्हेंबर २०२२ या अर्हता‎ दिनांकावर आधारित नाशिक विभाग‎ पदवीधर मतदार संघासाठी मतदार‎ नोंदणीबाबत भारत निवडणूक‎ आयोगाकडील दि. १४ जुलै२०२२‎ रोजीच्या पत्रानुसार मतदार नोंदणी‎ कार्यक्रम घोषित केला आहे.‎ लोकप्रितिनिधीत्व अधिनियम १९५०‎ चे कलम २२ व २३ मधील‎ तरतुदीनुसार निवडणुकीमध्ये‎ नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या‎ शेवटच्या तारखेपर्यंत मतदार याद्या‎ अद्यावत करण्यासाठी खुल्या‎ राहतील अशी तरतूद आहे.

तथापि,‎ भारत निवडणूक आयोगाकडील ३‎ जानेवारी, २०२३ रोजीच्या पत्रातील‎ मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नामनिर्देशन‎ पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या‎ तारखेच्या १० दिवसांपूर्वी पदवीधर‎ मतदार नोंदणीकरिता प्राप्त झालेल्या‎ अर्जावर कार्यवाही करता येईल असे‎ कळवण्यात आले आहे.

नाशिक‎ विभाग पदवीधर मतदार संघ‎ निवडणूक २०२२-२३ करिता‎ नामनिर्देशन दाखल करण्याचा‎ शेवटचा १२ जानेवारी,२०२३ आहे.‎ त्यामुळे आयोगाच्या पत्रातील‎ सूचनांप्रमाणे नाशिक विभाग‎ पदवीधर मतदार नोंदणीकरिता २‎ जानेवारी, २०२३ पर्यंत प्राप्त पदवीधर‎ मतदार नोंदणी अर्जावर कार्यवाही‎ करुन मतदार यादी अद्यावत‎ करण्यात येणार असल्याचे उप‎ जिल्हा निवडणूक अधिकारी‎ अरविंद अंतुर्लीकर यांनी कळवले‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...