आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:गांजाच्या शेतीवर कारवाई; तीन लाख रुपये किमतीची रोपे नष्ट

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान शिवारात पुन्हा एकदा गांजाची शेती आढळून आली. पोलिसांनी गांजाची रोपे नष्ट केली. शेतमालक शिवाजी फेका वळवी यांच्यावर शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पाेलिसांना लाकड्या हनुमान परिसरातील दुर्गम भागात गांजाची शेती केली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर छाप्यामध्ये पोलिसांना तुरीच्या आड गांजाची रोपे लावल्याचे दिसले. सुमारे ५ ते ६ फुटांपर्यंत ही रोपे होती. पोलिसांनी १७६ रोपे नष्ट केली. कारवाईत सुमारे १५२ किलो ६०० ग्रॅम गांजा मिळून आला. त्याची किंमत सुमारे ३ लाख ३ हजार २०० रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...