आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील अतिक्रमणावर महापालिकेच्या पथकाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार बुधवारी वडजाई रोडवरील शाळा क्रमांक ५३,५४ जवळील रस्त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणावर मनपा पथकातर्फे कारवाई करीत काढण्यात आले. महापालिका अतिक्रमण विरोधी पथकातर्फे बुधवारी शहरातील वडजाई रोड मनपा शाळा क्रमांक ५३,५४ कडुन मदरसा फलदारीनकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेख फईम शेख मजीद या व्याक्तीने रस्तारुंदीत भिंतीचे बांधकाम करुन अतिक्रमण केले होते. यामुळे सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. त्यासंदर्भात तक्रारी प्राप्त होत्या.
त्याअनुशंगाने मनपा प्रशासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे हे अतिक्रमण काढण्यात आले आहे. यावेळी अतिक्रमण विभाग प्रमुख प्रसाद जाधव, चाळीसगांव रोड पोलिसस्टेशनचे पाेलिस निरीक्षक धीरज महाजन, अविनाश परदेशी व कर्मचारी त्याचप्रमाणे अतिक्रमण विभागाचे संतोष घडी, युवराज खरात, सनी दुर्दळे, मोहन गवळी, जाकीर बेग, राहुल फुलपगारे, भुषण अहिरे आदी उपस्थित होते.
नवरंगजवळही कारवाई
महापालिका पथकातर्फे शहरातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात येत आहे. त्यात बुधवारी देवपूर भागातील नवरंग जलकुंभाच्या जवळील परिसरात व रस्त्यालगत केलेले खाद्य पदार्थ विक्री दूकान, गॅरेज, चहा, फळ विक्रेते यांनी केलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे. रस्त्यालगत पुन्हा पुन्हा अतिक्रमण होत असल्याने वाहतुकीस त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकरीता रस्त्यावरील व जलकुंभावजवळील अतिक्रमणावर कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.