आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:मोकाट जनावरांवरील कारवाई थंडावली

धुळे2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात मोकाट जनावरांवरील कारवाई पुन्हा थंडावली आहे. त्यामुळे त्रास वाढला असून, महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शहरातील विविध भागातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरे फिरत असतात. काही वेळा चौकात जनावर ठाण मांडतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. तसेच अपघात होण्याचा धोका वाढतो.

त्यामुळे मोकाट जनावरांवर कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने होत होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी मोकाट जनावरांच्या मालकांना नोटीस दिली. आत्तापर्यंत १५० जनावरे मालकांकडून १५ ते २० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...