आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:शहरात रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमित दुकानांवर केली कारवाई

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दत्तमंदिर भागातील महाजन हायस्कूल शेजारी आग्रा रोडच्या कडेला पत्र्याचे शेड करून दुकाने थाटून अतिक्रमण करण्यात आले होते. त्या अतिक्रमित दुकानावर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातर्फे कारवाई करीत काढण्यात आले आहे.

शहरातील अतिक्रमणावर महापालिकेतर्फे अधून मधून कारवाई करण्यात येत आहे. मात्र शहरात मुख्य रस्त्यालगत मोठया प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. त्या अतिक्रमणामुळे रस्त्यावरील वाहतुकीला त्याचा अडथळा ठरतो. शहरात याप्रमाणे मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरच अतिक्रमण करुन व्यवसाय थाटण्यात आले आहे. तर बुधवारी जुना मुंबई आग्रा महामार्गालगत महाजन हायस्कूल शेजारी रस्त्याच्या कडेला पत्र्याचे शेड करुन रांगेत दुकाने थाटण्यात आली होती. त्यामुळे रहदारीला त्याचा अडथळा निर्माण होत होता. त्याकरीता अखेर मनपा अतिक्रमण विरोधी पथकातर्फे कारवाई केली. येथील सात ते आठ दुकाने जेसीबीच्या साह्याने काढली.

बातम्या आणखी आहेत...