आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातळोदा तालुक्यातील छोटा धनपूर येथील जि.प. शाळेत बोरद केंद्राची शिक्षण परिषदेत मागोवा, मुलांच्या शिक्षणातील पालकांचा सहभाग, विद्यांजली कार्यक्रम, विविध उपक्रमांचा आढावा, केंद्रातील शैक्षणिक गरजांसह शैक्षणिक परिपत्रक, वेबसाइट लिंक भरणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी बोरद केंद्राचे केंद्र मुख्याध्यापक रऊफ शाह तर प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत मोठे हे उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान पाटील, ग्यान फाउंडेशनचे प्रतिनिधी राहुल मिसाळ, तळाेदा गटसाधन केंद्राचे साधन व्यक्ती नंदू पाटील हेही उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षण परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
शिक्षण परिषद मागोवा ज्योतिराम डोणे, एन.ए.एस. विश्लेषण विजय गिरासे, मुलांच्या शिक्षणातील पालकांची भूमिका धनसिंग वसावे, मूलभूत साक्षरता, संख्याज्ञान भाषा व गणित भगतसिंग वळवी, गणेश पाटील, सूरसिंग पवार, गुरू नेव्हिएटर सतीश पाटील, नितीन येवले यांनी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक शाह यांनी शैक्षणिक मार्गदर्शन व आढावा घेतला. सेतू कार्यक्रम, निपुण भारत, विद्यार्थी उपस्थिती, गुणवत्ता वाढ इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लाखापूर शाळेचे विषय शिक्षक कांतिलाल भील यांनी केले. शिक्षण परिषदेत केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. छोटा धनपूर शाळेचे मुख्याध्यापक मोहन ठाकरे, रईसाबानू शहा, गिरीश गांगुर्डे, अंबालाल नाईक व उमेश महाजन यांनी यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.