आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:तऱ्हाडीत आदर्श शिक्षक पुरस्कारांचे झाले वितरण

तऱ्हाडीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिरपूर येथील आर. सी. पटेल प्राथमिक शाळेत झालेल्या कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. माजी नगराध्यक्ष संगीता देवरे अध्यक्षस्थानी होत्या. शिक्षण विस्तार अधिकारी ई. बी. आव्हाड. डी.पी. बुवा, डॉ. नीता सोनवणे, तापी परिसर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे, कविता बाविस्कर, शारीरिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष अशोक महाजन, बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण, सचिव जयश्री चव्हाण, प्रा. दिलवरसिंग गिरासे, मुख्याध्यापक सी. डी. पाटील, महेंद्र खोंडे आदी उपस्थित होते.

पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. नीता सोनवणे यांना जिल्हा परिषदने आदर्श अधिकारी म्हणून गौरवले होते. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मुख्याध्यापक छोटू देवराव पाटील, उपशिक्षक संतोष नानाभाऊ पाटील, पंकज दगा बेडसे, रामेश्वर पांडुरंग माळी, नरेंद्र गोकुळ मराठे, चेतनकुमार विनायकराव पाटील, कल्पना सुनील पाटील, कांतीलाल भगवान लोहार यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. विवेक ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...