आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्येष्ठ नागरिकांनी वृद्धत्व कंटाळवाणे वाटू नये यासाठी त्याला सकारात्मकतेची जोड द्यावी, असे मत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी व्यक्त केले. येथील किसान विद्या प्रसारक संस्थेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा नुकताच मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी संस्थेचे सचिव निशांत रंधे, विश्वस्त रोहित रंधे, प्राचार्य डॉ. एस. एन. पटेल, विनायक देवरे, सुभाष कुलकर्णी, संस्थेचे विश्वस्त श्याम पाटील, संजय गुजर, व्यवस्थापक आनंद पाटील, के. डी. बच्छाव, सीताराम माळी, भय्या माळी, एम. के. भामरे, सुभाष अहिरे आदी उपस्थित होते. डॉ. तुषार रंधे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांनी जीवनाचा मनमुराद आस्वाद घ्यावा. तसेच संस्थेशी असलेला ऋणानुबंध जपून ठेवत संस्थेला मार्गदर्शन करावे.
ज्येष्ठांनी सामूहिक पर्यटन करावे. ज्येष्ठांसाठी संस्थेतर्फे सुसज्ज असा सभागृह, आरोग्य सुविधा पुरवण्यात येतील, असेही ते म्हणाले. निशांत रंधे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. मनोज निकम यांनी ज्येष्ठांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. माळी, प्रा. डॉ. लता गुजराथी, जी. ओ. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. योगिता पाटील यांनी तुन्हं मन्हं तोंड शे हा अहिराणी कार्यक्रम केला. कार्यक्रमात प्राचार्य डॉ. एस. एन. पटेल, प्राचार्य एस. एस. राजपूत यांच्यासह ७५ वर्षे पूर्ण झालेल्या १५ सेवानिवृत्तांचा सत्कार झाला. सुरेश बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. पी. डी. माळी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. एस. एन. पटेल, कार्याध्यक्ष प्रा. वाय. डी. बेडिस्कर, सचिव शालिक तिरमले आदींनी प्रयत्न केले. निवृत्त कर्मचाऱ्यांनी संघटित राहावे, या उद्देशाने हा उपक्रम झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.