आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंचाईवर मात:304 कोटींच्या योजनेला प्रशासकीय मंजुरी चिमठाणेसह 85 गावांचा पाणीप्रश्न सुटणार; महत्वाकांक्षी ग्रीड पाणीपुरवठा

धुळे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सतत अवर्षणग्रस्त असलेल्या शिंदखेडा तालुक्यातील गावांना पाणी टंचाईला नेहमीच सामोरे जावे लागते. टंचाईचे संकट कायमस्वरूपी निकाली निघावे, या करिता आमदार जयकुमार रावल यांनी मंत्री पदाच्या काळात ग्रीड योजनांचा प्रस्ताव तयार केला. त्यात चिमठाणेसह ८५ गाव पाणीपुरवठा योजनेला शासनाने नुकतीच प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. ३०४ कोटी रुपये खर्चाची ही योजना तापी नदीवरून राबविण्यात येणार आहे.

माजी मंत्री जयकुमार रावल यांनी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा ग्रीड योजनेच्या धरतीवर शिंदखेडा तालुका ग्रीड योजनाचा प्रस्ताव शासनाला सादर केला. त्यानंतर सत्तांतर व कोरोनाच्या साथीमुळे योजनेला उशीर झाला. पण अखेर राज्य शासनाने यासाठी ३०४ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. ज्या गावांना सतत पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, त्यांना तापी नदीवरून सुलवाडे बॅरेज हा शाश्वत स्रोत असल्याने ६ झोन्स मध्ये ही योजना राबविली जाणार आहे. यात जलशुद्धीकरण केंद्राचा देखील समावेश आहे. २०५४ पर्यंत लोकसंख्या वाढ गृहीत धरून ही महत्त्वाची योजना तयार होणार आहे. यात प्रति मानसी ३५ ते ४५ लिटर पाणी देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी पाटबंधारे विभागाकडे पाणी आरक्षण प्रस्ताव देखील सादर करण्यात आला आहे. या महत्त्वांकाक्षी योजनेला प्रशासकिय मान्यता मिळाली आहे. येत्या २०२४ पर्यंत योजनेचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी शासन स्तरावर ठरलेल्या वेळेप्रमाणे सर्वच कामे पार पडली. तर निश्चितच शिंदखेडा तालुक्यातील ८५ गावांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.

या गावांना होणार लाभ
वॉटर ग्रीड योजनेत एकूण ६ एम.बी.आर. आणि ६ झोन्स आहेत. त्यात खलाणे झोनची क्षमता ४ लाख ,९० हजार लिटर असून त्यात चांदगड, डाबली, धांदरणे, गोराणे, कलमाडी, कंचनपूर, खलाणे, माळीच, पिंपरखेडा, सारवे, वाघोदे, वायपूर, विटाई, वाघाडी बु., वाघाडी खु., बाभळे आदी १६ गावांचा समावेश आहे. तर साळवे झोनची क्षमता ३ लाख ८० हजार लिटर असून अमराळे, अरावे, चिमठावळ, डांगुर्णे, सोंडले, दराणे, रोहाणे, जखाणे, मुकटी, शेवाडे, तामथरे, साळवे आदी १२ गावांचा समावेश आहे. याच बरोबरच जलशुध्दीकरण केंद्र नावाचा एक झोन तयार केला असून त्यात चिमठाणे, पिंप्री, दलवाडे प्र.नं., दरखेडा, हतनूर, कामपूर, महाळपूर, मेथी, निशाणे, सोनशेलू, बाभुळदे, विखरण आदी १२ गावांचा समावेश आहे. दुसऱ्या जलशुध्दीकरण केंद झोन क्षमता ५ लाख ४० हजार लि.एवढी आहे, यात चौगांव बु., चौगांव खु, दलवाडे, चिरणे, अजंदे खु., दसवेल, दत्ताणे, गव्हाणे, शिराळे, अलाणे, होळ, जातोडे, जोगशेलू, कदाणे, मेलाणे, निरगुडी, कुमरेज, परसामळ, पिंप्राड, रहिमपुरे, टेंभलाय, वरूळ, घुसरे, भटाणे, विखुर्ले गावांचा समावेश आहे, सतारे झोन क्र. ५ मध्ये ९ गावांचा समावेश असून त्यात देगाव, देवी, कर्ले, देवकानगर, परसुळे, रेवाडी, सतारे, अक्कलकोस, वाडी आदी गावांचा समावेश आहे. वरझडी झोन मध्ये १२ गावांचा समावेश असून अंजनविहिरे, धावडे, खर्दे, मालपूर, मांडळ, कलवाडे, सुराय, वरझडी, झिरवे आदी गावांचा समावेश आहे.

अशी आहे पाणीपुरवठा योजना
योजनेतंर्गत सुलवाडे बॅरेज तापी उदभव अवक विहीर, परीक्षण विहीर, कनेक्टिंग मेन, पुरवठा विहीर व पंप हाऊस, जोडपूल, अशुद्ध पाणी पंपिंग मनिनरी, अशुद्ध पाण्याची उध्दरण वाहिनी, २३.२० कि.मी. लांबीची राहणार आहे. जलशुद्धीकरण केंद्र व संर्किण कामे, शुध्द पाणी पपिंग मनिशरी, शुध्द पाण्याची वाहिनी, ५७ कि.मी. आहे. उंच पाण्याचे जलकुंभ, शुध्द पाण्याची गुरूत्‍व वाहिनी २५९ कि.मी. आहे. वितरण व्यवस्था ५१६ कि.मी आहे. तर ॲटोमेशन सोलर प्लाँट मुख्य संतुलित जलकुंभ, देखील प्रस्तावित आहेत.

बातम्या आणखी आहेत...