आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवत्ता यादी:आयटीआयच्या पहिल्या फेरी अखेर ९३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश ; दुसऱ्या फेरीसाठी ७ राेजी गुणवत्ता यादी होणार प्रसिद्ध

धुळे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अर्थात डीव्हीईटीच्या वतीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. बुधवारी पहिल्या फेरीतील प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली. जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी आयटीआय मिळून ९३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. आता दुसऱ्या फेरीसाठी गुणवत्ता यादी ७ ऑगस्ट राेजी जाहीर होणार आहे.

आयटीआयची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. पहिल्या गुणवत्ता यादीनुसार मागील चार दिवसांपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होती. जिल्ह्यातील २३ आयटीआय मध्ये एकूण २ हजार २६८ जागा आहेत. या पैकी गुरुवारी पहिल्या फेरीअखेर शासकीय आणि खासगी आयटीआय मिळून ९३२ जागांवर विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. दरम्यान, आता ७ ऑगस्ट रोजी दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ८ ते १२ ऑगस्ट दरम्यान दुसऱ्या फेरीतील प्रवेश देण्यात येतील. त्यानंतर तिसरी प्रवेश फेरी १७ ते २० ऑगस्टदरम्यान तर २४ ते २७ ऑगस्टदरम्यान होणार आहे.

तर समुपदेशन फेरी ३० व ३१ ऑगस्ट रोजी नोंदणी करावी लागणार आहे. तर २ ते ५ सप्टेंबरदरम्यान समुपदेशन फेरीच्या जागावाटप होणार आहेत. आयटीआयचे शैक्षणिक सत्र १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशासाठी संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी २७ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

शासकीय आयटीआयला विद्यार्थ्यांकडून प्राधान्य
शिंदखेडा शासकीय आयटीआय १९२, शिरपूर शासकीय आयटीआय १५६, साक्री शासकीय आयटीआय ६०, सुकापूर आदिवासी मुलांची आयटीआय ६०, नवापाडा आदिवासी आयटीआय ६४ अशा एक हजार ५९२ जागा आहेत. या पैकी पहिल्या फेरीत धुळे आयटीआय ४३४, शिंदखेडा ९५, सुकापूर ३९,नवापाडा ३३,शिरपूर ७३ तर पिंपळनेर २४ जागांवर प्रवेश झाले आहेत.एकूण ६८८ विद्यार्थ्यांचे प्रवेश शासकीय आयटीआयमध्ये झाले आहेत.त्या तुलनेत खासगी आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या कमी आहे.

बातम्या आणखी आहेत...