आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:आक्रमक भूमिकेनंतर महापौर वकिलांकडे

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नागरी सुविधांबद्दल वकिलांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महापाैर प्रदीप कर्पे, महापालिका स्थायी समिती सभापती शीतल नवले यांनी रविवारी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. आर. डी. जोशी यांची भेट घेतली. तसेच त्यांची भूमिका मांडली. याविषयावर चर्चेसाठी उद्या साेमवारी वकिलांची पुन्हा बैठक होणार आहे. दरम्यान, वकील उद्या सोमवारी मनपा प्रशासनाच्या विरोधात लाल फिती लावून काम करणार आहे.

शहरातील नागरी सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते आहे. त्यामुळे समाजऋण मानून वकील संघाने याविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मनपा व जिल्हा प्रशासनाविरुद्ध याचिका दाखल करण्याचीही तयारी दर्शवली आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळी महापौर प्रदीप कर्पे, सभापती शीतल नवले यांनी वकील सघांचे अध्यक्ष अॅड. आर. डी. जोशी यांची भेट घेतली.

या वेळी संघाचे उपाध्यक्ष अॅड. मधुकर भिसे, अॅड. दिनेश गायकवाड, अॅड. रवी देसर्डा, योगेश खैरनार आदी उपस्थित होते. देवपुरातील रस्त्यासाठी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अक्कलपाडा योजनेचे काम सुरू असून हे काम झाल्यावर शहरात जानेवारीपर्यंत एक दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन असल्याचे माहिती या वेळी देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...