आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीची परीक्षा:परीक्षा केंद्रात तपासणी करून सोडले‎ तरीही माय मराठीच्या पेपरला कॉपी‎

धुळे‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक‎ शिक्षण मंडळातर्फे गुरूवारपासून‎ दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला.‎ बारावीच्या परीक्षेप्रमाणे दहावीच्या‎ परीक्षेसाठीही कॉपी मुक्त अभियान‎ राबवले जाते आहे. त्यामुळे तपासणी‎ करूनच प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा‎ केंद्रात सोडले जात होते. ही स्थिती‎ असतानाही शहरातील नुतन पाडवी‎ विद्यालयात मराठीच्या पेपरला कॉपी होत‎ असल्याचे आढळून आले. या ठिकाणी‎ एका कॉपी बहाद्दरावर भरारी पथकाने‎ कारवाई केली. गैरप्रकार रोखण्यासाठी‎ शिक्षणाधिकाऱ्यांसह विविध‎ अधिकाऱ्यांच्या पथकांनी परीक्षा केंद्राला‎ भेट दिली.‎

दहावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात‎ व्हावी, यासाठी शिक्षण मंडळातर्फे‎ विविध उपाययोजना करण्यात आल्या‎ होत्या. कॉपी रोखण्यासाठी प्रत्येक परीक्षा‎ केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात‎ आला होता. जिल्ह्यातील‎ अतिसंवेदशनील केंद्रात पोलिसांची‎ संख्या जास्त होती. सकाळी दहा‎ वाजेपासूनच परीक्षा केंद्राच्या बाहेर‎ पालक व विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती.‎ साडेदहा वाजता विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश‎ देण्यात आला.

प्रत्येक विद्यार्थ्याची‎ तपासणी केली जात होती. पालकांना‎ परीक्षा केंद्रात प्रवेश नव्हता. पेपर सुरू‎ झाल्यावर शिक्षणाधिकारी मोहन देसले‎ यांनी शहरातील कमलाबाई कन्या‎ शाळा, अग्रसेन विद्यालय, नुतन पाडवी‎ माध्यमिक विद्यालयासह इतर परिक्षा‎ केंद्राना भेट दिली. शिक्षणाधिकारी देसले‎ यांनी नुतन पाडवी विद्यालयात एका‎ कॉपी बहाद्दरावर कारवाई केली. शिक्षण‎ विभागाच्या सहा व महसुल विभागाच्या‎ पाच पथकांनी विविध केंद्राला भेट दिली.‎

"कृतीयुक्त''मुळे फायदा
कृतीयुक्त प्रश्नपत्रिका असल्यामुळे‎पेपर अवघड वाटला‎नाही. अतिरिक्त दहा‎मिनिटामुळे पेपर‎पुन्हा तपासता‎आला. पे कोणतेही‎दडपण नव्हते.‎ प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या समोर‎ उघडले.‎ वैष्णवी सोनवणे, कमलाबाई शाळा‎

पुरेसा वेळ मिळाला
‎पेपर लिहिण्यासाठी वेळ पुरेसा‎होता. दहा मिनिट‎ जास्त मिळाल्याने‎ पेपर झाल्या वर‎ तपासता आला.‎मंडळाच्या‎ नियोजनानुसार ११‎ वाजता उत्तरपत्रिका हातात पडली‎ होती.‎ दुर्गेश गवळी, न्यु. सिटी. हायस्कुल

पालक केंद्राच्या बाहेर थांबून‎
कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी‎ प्रयत्न होता आहे. त्यानुसार प्रत्येक परीक्षा‎ केंद्रात पोलिसांसह गृहरक्षक दलाचे जवान‎ तैनात होते. शहरातील महाराणा प्रताप‎ विद्यालय, एस. आर. पाटील विद्यालय, न्यू‎ सिटी हायस्कुल, अग्रसेन विद्यालय, नुतन‎ पाडवी विद्यालय, अभय विद्यालय परीक्षा‎ केंद्राच्या बाहेर पालकांची गर्दी होती. काही‎ पालक पेपर सुटत नाही तोपर्यंत केंद्राच्या‎ बाहेर उभे होते.‎

बातम्या आणखी आहेत...