आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:एनडीएची परीक्षा, खडतर प्रशिक्षण पूर्ण करून रिक्षाचालकाचा मुलगा सैन्यदलात लेफ्टनंट

धुळे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एका रिक्षाचालकाच्या मुलाने एनडीएची परीक्षा आणि खडतर प्रशिक्षण पूर्ण करून आर्मीमध्ये लेफ्टनंटपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळविला आहे. राजशेखर सुरेश जाधव असे अधिकारी तरुणाचे नाव आहे. तो मिल परिसरातील साने गुरुजी हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी आहे.

शहरातील सर्वसामन्या कुटुंबातील राजशेखरचे वडील सुरेश जाधव हे रिक्षाचालक असून आई कमलबाई जाधव जिल्हा रुग्णालयात परिचारिका आहे. राजशेखरचे प्राथमिक शिक्षण शहरातील कनोसा विद्यालयात झाले. त्यानंतर अकरावी-बारावीचे शिक्षण त्याने सर्विसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट औरंगाबाद येथून पूर्ण केले. हे शिक्षण घेत असतानाच त्याची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एनडीएसाठी निवड झाली. खडकवासला पुणे येथील प्रबोधनीमध्ये तीन वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून त्याची लेफ्टनंट या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आजच्या काळात राजशेखरचे यश तरुणांना प्रेरणा देणारे आहे.

डेहराडूनला रवाना होणार
डेहराडून येथे आयएमएमध्ये परीक्षाविधीन कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी राजशेखर ८ जुलै रोजी डेहराडूनला रवाना होणार आहे. आर्मीमध्ये लेफ्टनंट म्हणून निवड झाल्याबद्दल राजशेखर आणि त्याच्या आई-वडिलांचे मिल परिसरासह नातेवाईक, कुटुंबाकडून कौतुक केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...