आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक लाखांचा ऐवज लांबवला:छतावाटे घरात प्रवेश मिळवत व्यापाऱ्याकडे केली हातसफाई

धुळे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील साक्री रोडला लागून असलेल्या वैद्य नगरातील कांदा व्यापाऱ्याच्या घरात छतावाटे शिरुन चोरट्यांनी एक लाखांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वैद्य नगरात प्लॉट नं. ९ या ठिकाणी कांदा व्यापारी किशोर शेषमल जैन रहातात. ते बाहेरगावी गेले होते. ही संधी चोरट्यांनी हेरली. चोरट्यांनी छतावाटे घरात शिरून दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर लोखंडी कपाटातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, सुमारे २५ ग्रॅम वजनाची मंगलपोत, ६० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, दोन सोन्याच्या अंगठ्या, चांदीच्या चाळ तसेच सुमारे ४५ हजारांची रोकड लांबवली. जैन कुटुंब घरी आल्यावर हा प्रकार समोर आला. त्यानंतर शहर पोलिसांना कळवण्यात आले. काही वेळातच पोलिस पथकही दाखल झाले. याशिवाय उसे तज्ञ व श्वान पथकाला बोलावण्यात आले. या प्रकरणी किशोर जैन यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...