आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकापडणे देवभाने रस्त्याचे काम आमदार कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांनी साडेपाच कोटी रुपये निधीतून सुरू झाले. मात्र गावात होत असलेल्या काँक्रिटीकरण रस्त्याचे व काँक्रिटीकरण गटारींचे काम स्थानिक ठेकेदाराने सुरू करताच गावातून विरोध सुरू झाला. ही बाब आमदार कुणाल पाटील यांच्याकडे तक्रारी स्वरूपात जाताच त्यांनी दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यामुळे कापडणे गावातील काँक्रीट गटारींचे काम दुसऱ्या ठेकेदाराकडून केले जात असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
कापडणे गावाच्या सुरुवातीपासून भवानी चौक, नवीन दरवाजा, धनूर रस्त्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत असलेले काँक्रिटीकरण काम सुरू झाले. मात्र संबंधित ठेकेदार माती मिश्रित रेती व कमी सिमेंट टाकत असल्याने तक्रार करीत काम बंद पाडण्याची विनंती केली होती. त्यामुळे स्थानिक ठेकेदाराचे काम रद्द करून दुसऱ्या एका बांधकाम ठेकेदाराला काम देण्यात आले. याचे ग्रामपंचायत सदस्या वैशाली माळी, माजी उपसरपंच बापू माळी, विश्वास माळी, भरत पाटील, हिंमत माळी, महेश बडगुजर, रवींद्र माळी, बाबूलाल माळी, देविदास सूर्यवंशी, जगदीश पाटील,भारत माळी, किशोर पाटील,विजय माळी, अतुल पाटील, निंबा माळी, दिनकर माळी यांनी स्वागत केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.