आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:ठेवींसाठी अभिकर्ता; ठेवीदारांची गांधीगिरी

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मैत्रेय उपभाेक्ता व अभिकर्ता असाेसिएशनतर्फे रविवारी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन झाले. मैत्रेयच्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळावे या मागणीसाठी हे आंदोलन झाले. शहरातील अनेकांनी मैत्रेय कंपनीत पैसे गुंतवले आहे. ठेवीदारांना ठेवीची मुदत पूर्ण झाल्यावरही पैसे मिळालेले नाही.

मैत्रेय कंपनीने २०१६ पासून ग्राहकांना परतावा देणे बंद केले आहे. ठेवीची रक्कम वेळेवर परत न मिळाल्याने काहींनी आत्महत्या केली आहे. कंपनीच्या प्रतिनिधींना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. गुंतवणूकदारांचे बोलणे ऐकून घ्यावे लागते. शासनही याविषयी ठोस निर्णय घेत नाही. त्यामुळे याविषयाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन झाले. त्यात संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सुरेश सपकाळे, नीलेश वाणी, नाना पाटील, राजेंद्र देवरे, दिलीप माळी, अशाेक साेनवणे, दिलीप शिंदे, राजुकुमार पवार, वसंत भालेराव सहभागी झाले. आंदाेलनाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शहर जिल्हाध्यक्ष डाॅ. अनिल भामरे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भाेसले आदींनी पाठिंबा दिला.

जप्त मालमत्तांचा लिलाव करा
कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांना अटक करावी, जप्त मालमत्तांची विक्री करून पैसे द्यावे, जलदगती न्यायालयात खटला चालवावा, मंत्रालयात स्वतंत्र बैठक घ्यावी, कंपनीच्या प्रतिनिधींवर गैरसमजुतीतून दाखल गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...