आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:कृषी पदवीधारकांनो ; व्यवसायास प्राधान्य द्या

शहादा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळात प्रत्येकाला शिकून चांगली नोकरी प्राप्त करणे शक्य होत नाही. त्यामुळे कृषी पदवीधारकांनी नोकरीपेक्षा व्यवसायातून उत्पन्नाचा स्रोत कसा निर्माण होईल याचा विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन कृषी व व्यवसाय तज्ज्ञ घनश्याम पाटील यांनी केले. त्यासाठी अळंबी उत्पादन हा उत्तम व्यवसाय ठरू शकतो. पूर्ण वेळ लक्ष केंद्रित करून परिश्रमाच्या जोरावर नोकरीपेक्षा अळंबी उत्पादन व्यवसाय चांगले उत्पन्न देईल, असा सल्लाही दिला.

येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात ‘अळंबी उत्पादनातील संधी व आव्हाने’ या एकदिवसीय उद्योजकता शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश पटेल होते. यावेळी कृषी तज्ञ पाटील यांनी, अळंबी उत्पादनात येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाय याबाबत मार्गदर्शन केले. व्यवसाय सुरू करताना लागणाऱ्या गोष्टी, सरकारी योजना, विक्री व्यवस्थापन अशा विविध बाबींवर त्यांनी सखाेल मार्गदर्शन केले. कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या उद्योजकता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पटेल यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. संयोजन प्रा.विजय सपकाळ, प्रा.रूपेश पाटील, प्रा.मुकेश कोळी आदींनी केले.

बातम्या आणखी आहेत...