आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:कृषी विद्यापीठ:13 वर्षांपासून संघर्ष, पुन्हा देणार स्मरणपत्र

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन झाल्यावर नव्याने हाेणारे कृषी विद्यापीठ धुळ्यात व्हावे, अशी मागणी १३ वर्षांपासून केली जाते आहे. तसेच गेल्या सहा वर्षांपासून नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांना स्मरण निवेदन दिले जाते. त्यानुसार यंदाही साेमवारी (दि.२) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाऱ्यांना स्मरण निवेदन दिले जाईल, अशी माहिती संघर्ष समितीचे निमंत्रक प्रा. शरद पाटील यांनी दिली.

शहरातील कृषी महाविद्यालयात कृषी विद्यापीठासाठी अावश्यक सुविधा असल्याने नियाेजित कृषी विद्यापीठ धुळ्यात व्हावे यासाठी माजी अामदार प्रा. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषी विद्यापीठ निर्माण कृती समिती स्थापन करण्यात अाली अाहे. विद्यापीठासाठी सातत्याने पाठपुरावा केला जातो आहे. विद्यापीठ विभाजनासाठी नेमलेली डाॅ. वाय.एस.पी. थाेरात समिती व डाॅ.व्यंकटेश्वरलू समितीने धुळ्यात विद्यापीठासाठी अनुकुलता दर्शविली अाहे. विद्यापीठासाठी १३ वर्षापासून पाठपुरावा सुरू असून जानेवारी २०१६ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांचा माेर्चा काढला हाेता. आता पुन्हा साेमवारी (दि.२) विद्यापीठ निर्माण कृती समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना स्मरण निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती प्रा. शरद पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...