आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅनलचे वर्चस्व:ऐंचाळे वि.का. सोसायटीत परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

धुळे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री तालुक्यतील ऐंचाळे येथील वि. का. सोसायटीच्या निवडणुकीत आमदार जयकुमार रावल पुरस्कृत परिवर्तन पॅनलने १३ पैकी १२ जागांवर विजय मिळवला. तसेच शांताराम भीमराव शेलार यांची चेअरमनपदी तर तुकाराम बोरसे यांची व्हाइस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी एन. एस. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यासाठी विशेष सभा घेण्यात आली. निवडीनंतर झालेल्या सभेत विश्वनाथ साबळे यांनी चेअरमन शेलार, व्हाइस चेअरमन बोरसे यांच्यासह संचालक नामदेव बाविस्कर, उत्तम साबळे, संजय साबळे, जगदीश बागले, राजेंद्र पाटील, बारकू साबळे, एकनाथ शेलार, चैत्राम जाधव, सायजाबाई शेलार, कमलबाई शेलार यांचा सत्कार केला.

या वेळी आप्पा बागले, सरपंच समाधान ढिवरे, उपसरपंच भय्या बोरसे, राजू साबळे, डॉ. नाना शेलार, रघुनाथ साबळे, नाना जाधव, श्रावण साबळे, साहेबराव साबळे, दादाभाई साबळे, गुलाब कंखर, धनराज तेले, दिलीप बच्छाव, बाबूराव पाटील, प्रकाश शेलार, काशिनाथ मराठे, जिभाऊ शेलार, भटू भोई, ज्ञानेश्वर शेलार, दीपचंद साबळे, नाना साबळे, तुकाराम साबळे, चुनीलाल शेलार, आप्पा साबळे, लखमीचंद शेलार, भाऊसाहेब शेलार, पंकज बोरसे, गंगाराम साबळे, अरुण महिरे, गोटू पिसाळ, विठू गोयकर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...