आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराेग्य तपासणी:अक्कलकुवा जि.प. मुलांच्या शाळेत 77 विद्यार्थ्यांची आराेग्य तपासणी

अक्कलकुवा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जिल्हा परिषदेच्या मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.परेश चावडा, औषध निर्माण अधिकारी जयश्री राठोड यांनी आरोग्य तपासणी केली. आवश्यक असलेल्या विद्यार्थ्यांवर औषधाेपचारही करण्यात आला. या शिबिराचा ७७ विद्यार्थ्यांचा लाभ झाला.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीरकुमार ब्राह्मणे, मुख्याध्यापक रत्नमाला माळी, शिक्षक सचिन बडोले, मनीषा बोरसे, फिरोज शेख आदी उपस्थित होते. यावेळी डॉ.चावडा, औषधनिर्माण अधिकारी राठोड यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...