आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वज निधी:अक्कलकुवा पंचायत समितीची ध्वज निधीसाठी ७० हजारांची मदत

अक्कलकुवा4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पंचायत समिती कार्यालयातर्फे सैनिक कल्याण निधीला ७० हजार ६०० रुपयांची मदत करण्यात आली आहे. अक्कलकुवा पंचायत समिती यांच्या वतीने कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंकज पाटील यांनी ध्वज निधी संकलनाचा धनादेश अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांच्याकडे सुपुर्द केला.

यावेळी अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पोतदार, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक सुभेदार मेजर रामदास पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पंचायत समितीने हा ध्वज निधी संकलित केला आहे.

बातम्या आणखी आहेत...