आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदयात्रा:स्वातंत्र्य, संविधानासाठी 23 रोजी अक्कलकुवा ते शहादा पदयात्रा

शहादा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्य, संविधानासाठी २३ नोव्हेंबर रोजी अक्कलकुवा ते शहादा अशी ७५ किमी पदयात्रा काढण्यात येणार आहे. संविधान सन्मान समारोह साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर बोधीवृक्ष परिसरातील विपश्यना केंद्रात बैठक झाली. या बैठकीत नियोजन करण्यात आले.

२६ रोजी शहादा तालुक्यातील शेवटच्या गावापासून शहाद्यापर्यंत मोटारसायकल रॅलीच्या आयोजनाचे नियोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत सर्वांनी ११ वाजेपर्यंत पोहोचून ११ पासून १२ वाजेपर्यंत मुख्य मार्गाने महापुरुषांना अभिवादन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून रॅलीचे सभेमध्ये रूपांतर होईल.

या ठिकाणी नर्मदा बचाव आंदोलनाच्या सहित सर्व पुरोगामी, आंबेडकरी, बहुजन व संविधानाला मानणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रबोधन मेळावा होईल. संविधानाच्या सन्मान करत सांस्कृतिक कार्यक्रम होतील. २३ नोव्हेंबरपासून अक्कलकुवा येथे सुरू होणाऱ्या पदयात्रेला नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत पदयात्रेला सुरुवात होईल. बैठकीला शिवाजीराव मोरे, अनिल ओंकार कुवर, सुनील पाटोळे, पीतांबर पेंढारकर, नरेंद्र कुवर, नानाभाऊ शिंदे, वेडू जगदेव, रमेश बिरारी, विष्णू जोंधळे उपस्थित होते.

नियोजनासाठी पुन्हा २२ नोव्हेंबर रोजी होणार बैठक
पुढची बैठक २२ नोव्हेंबरला सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सायंकाळी ६:०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. तर २६ रोजीच्या कार्यक्रमासाठी आपापल्या गावाचे कार्यक्रम दहा-साडेदहा वाजेपर्यंत आटोपून अकरा वाजेपर्यंत शहाद्याला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पोहाेचण्याचे नियोजन केले.

बातम्या आणखी आहेत...