आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहिती:अक्कलपाडा योजनेतून धुळे शहरात दिवाळीपूर्वी थेट होणार पाणीपुरवठा; खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी योजनेची पाहणी

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासाठी संजीवनी ठरणारी अक्कलपाडा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. जलवाहिनी, जॅकवेल, शुध्दीकरण प्रकल्पाचे काम सुरू असून नागरिकांना दिलेल्या आश्वासनाप्रमणे दिवाळीपूर्वी अक्कलपाडा योजनेतून शहरात पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी पाणी योजनेच्या पाहणी प्रसंगी दिली.

अक्कलपाडा धरणातून शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला अक्कलपाडा पाणी योजना मंजूर आहे. त्या योजनेचे काम सुरू आहे. याच कामाची पाहणी बुधवारी करण्यात आली. या वेळी खासदार डॉ.सुभाष भामरे, माजी महापौर प्रदीप कर्पे, स्थायी समिती सभापती शितल नवले, आयुक्त देवीदास टेकाळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता एस.सी.निकम, आर.सी. पाटील आदिसह अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी बोलतांना खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी सांगितले की, शहरासाठी अक्कलपाडा पाणी योजना अतिशय महत्वाची आहे. या योजनेमुळे नागरिकांना नियमीत पाणीपुरवठा करता येणार आहे. सध्या योजनेचे जलवाहिनीचे ८५ टक्के काम झाले आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पाचे ८० टक्के काम झाले आहे. तर जॅकवेलचे काम प्रगतीपथावर असून महिनाभरात ते पूर्ण होणार आहे, असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...