आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील मध्यवर्ती धुळे बसस्थानकात आलेल्या बसमधून सुमारे ३४ हजार रुपये किमतीच्या मद्याचा साठा मिळून आला. चाळीसगाव-सूरत बसमधून या मद्याची वाहतुक केली जात होती. कारवाईत १ हजार १४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहे. तर धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव-सुरत बस ( एम एच १०, बी एल ३३७५) ही धुळेमार्गे पुढील प्रवासाला जाणार होती.
या बसच्या डिक्कीमध्ये मद्यसाठा होता. याची माहिती मिळाल्यावर ही बस आगारात थांबवली. त्यांनी वाहनाची डिक्की तपासून पाहिल्यावर त्यात पांढऱ्या रंगाच्या चार गोण्या मिळून आल्यात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.