आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा पोलिस दलाच्या कारवाईचा आलेख वाढता असतांना शुक्रवारी विशेष पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांनी धुळे गाठले. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी जिल्हा पोलिस दलाने मोठी कारवाई करत त्यांना अनोखी भेट दिली. बनावट दारु, पिस्तुल व तलवारी जप्ती, तसेच शेतरकऱ्यांचा त्रस्त करणाऱ्या वीजमोटार चोरांचाही पोलिसांना शिताफीने छडा लावला. सुमारे ४ गुन्ह्यात ६ संशयितांना पोलिसांनी जेरबंद केले. तर एकूण ९ लाख ४२ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. वरिष्ट अधिकारी डॉ शेखर-पाटील, पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी जप्त मुद्देमालाची पाहणी केली.
शेतात पुरलेली दारु जप्त साक्री तालुक्यातील नांदवण येथील शेतात पुरलेली सुमारे ८ लाख ८१ हजार ४० रुपये किंमतीचा मद्यसाठा एलसीबीने शोधून काढला. तर संशयित चिंतामण उखा मालचे याने पळ काढला. एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. जप्त मद्यसाठा हरियाणातील असून पंजाबच्या सुल्तान नामक व्यक्तीकडून विक्रीसाठी आणण्यात आला होता. शिवाय गुजरातमध्ये अवैध विक्रीसाठी तो नेला जाणार होता.
आर्णीतील तरुणाच्या पिस्तुलची दहशत संपवली आर्णी शिवारातील तरुण मुकेश रमेश कोळी याला धुळे तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकाने गावठी कट्टा, एअर गन, काडतुससह अटक केली. २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.