आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोध:गांधी कुटुंबाला विनाकारण त्रास दिल्याचा आरोप; रास्ता रोको आंदोलनातून केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध

धुळे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना विनाकारण त्रास दिला जातो आहे. केंद्र सरकारच्या दबावामुळे ईडीकडून गांधी कुटुंबाची चौकशी केली जाते आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या येथील शाखेतर्फे शुक्रवारी शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सत्याग्रह व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोकोकरणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सोडले. या वेळी घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. शरद पाटील, माजी खासदार डी. एस. अहिरे, बापू चौरे, मनपाचे विरोधी पक्षनेते साबीर शेख, सरचिटणीस युवराज करनकाळ, रणजीत पावरा, साहेबराव खैरनार, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल, मुझफ्फर हुसेन, मनोहर पाटील, उत्तमराव माळी, अभिमन भोई, भानुदास गांगुर्डे, पंकज सूर्यवंशी, विश्वास बागुल, गणपत चौरे, गणेश गावती, प्रवीण चौरे, बाजीराव पाटील, मोठाभाऊ पाटील, डॉ. दरबारसिंग गिरासे, गुलाबराव कोतेकर, प्रकाश पाटील, रितेश पाटील, राजेंद्र देवरे, विशाल पवार, सुनील चौधरी, राहुल माणिक, नंदू खैरनार, अरूण पाटील, दीपक अहिरे, राजेंद्र खैरनार, बानूबाई शिरसाठ, विमल बेडसे, भगवान कालेवार, इम्तियाज पठाण, सी. झेड. पाटील, शकील अहेमद, एन. डी. पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संजय पाटील, दिनेश माळी, माधव बडगुजर, डॉ. प्रशांत बागुल, भरत पाटील, अमोल बोरसे, नरेंद्र पाटील, कुलदीप निकम, विरेंद्र झालसे, गेंदा पवारा, इरफान मिर्झा, नावीद शेख, शालीग्राम माळी, भावना गिरासे, सुमन मराठे, ईश्वर ठाकरे, लोटन माळी, नरेंद्र देसले, आनंद जावडेकर, सुरेश बैसाणे, नितीन देसले, वसंत कोळी, कल्लू पठाण, हुसेन बोहरी, निखील मोरे, जावेद देशमुख, उमेश वाडीले, मनोज मोरे, संदीप थोरात, विजय पाटील, बापू खैरनार, हेमराज पाटील, पंकज चव्हाण, हरीष पाटील, लंकेश पाटील आदी सहभागी झाले होते. नॅशनल हेरॉल्ड प्रकरण पुन्हा उकरून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांना सक्त वसुली संचालनालयाने त्रास देण्यास सुरूवात केली असल्याचा आरोप करण्यात आला.

आंदोलनासाठी प्रत्येकाने पुढे यावे
गांधी परिवाराला तुरुंगात टाकले तर देश पेटल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्यात या लढाईचे नेतृत्व स्वत: करू.काँग्रेस कार्यकर्त्यांनी नेत्यांविरूध्द होणाऱ्या चुकीच्या कारवाई विरोधात आवाज उठवण्याची आवश्यकता आहे.आमदार कुणाल पाटील, कार्याध्यक्ष, काँग्रेस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भाजप व केंद्र सरकार शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप झाला. प्रा. शरद पाटील यांनी नेत्यांना चौकशीला बाेलावून कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण केले जात असल्याचे स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...