आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डांबरीकरण:डांबरीकरण धूळमातीवर होत असल्याचा आरोप ; कॉलेज रस्त्यावरील डांबरीकरणाच्या कामावर उपस्थित होतोय प्रश्नचिन्ह

तळोदा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कॉलेज रस्त्याचे काम पालिकेने हाती घेतले असून, या कामात होणारे डांबरीकरण हे धूळमातीवर होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. तळोदा पालिकेचा माध्यमातून शहरातील विविध जोडरस्त्यांचे रुंदीकरण, दुभाजीकरण गटार व पथदिवे असे विविध कामे हाती घेण्यात आले आहेत.

यात इतर भागात रुंद रस्ते असल्याने रुंदीकरण व दुभाजीकरणाचे काम करताना अडचणी आल्या नाहीत. मात्र कॉलेज रस्ता मुळात अरुंद असून त्यात होणारे डांबरीकरण चुकीच्या पद्धतीने होत असल्या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने याची दखल घेत ठेकेदारकडून ते डांबरीकरण काढून पुन्हा नवीन रस्ता तयार करण्यात येत आहे.

चुकीचे अंदाजपत्रक : अधिक माहिती घेतली असता सदर कामाची मंजुरी ही २०१७ची असून त्या वेळी पालिकेने तयार केलेले अंदाजपत्रकच मुळात चुकीचे असल्याची चर्चा असून ज्या भागात हे काम सुरू आहे त्या भागात सतत दरवर्षी पावसात पाणी कमरे इतकं तुंबते. त्यामुळे अनेकांचा घरात तर व्यापारी आस्थापनामध्ये पाणी शिरून नुकसान होते. हा अनुभव पाहता या अंदाजपत्रकात सिमेंटची पाइप गटारचे प्रयोजन घेणे चुकीचे असून, या ठिकाणी पक्की मोठी गटार टाकणे आवश्यक होते. मात्र याचा तांत्रिक विचार या ठिकाणी करण्यात आला नाही. तसेच या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येत आहे. वास्तविक सखल भाग असल्याने पावसाळ्यात पाणी शिरते, असा पूर्वानुभव असताना डांबरी रस्ता ऐवजी काँक्रिटीकरण रस्ता टाकणे आवश्यक होते.

अंदाजपत्रकानुसार काम
काही ठिकाणी डांबरीकरण व्यवस्थित न झाल्याने त्या ठिकाणी टाकण्यात आलेला रस्ता काढून टाकण्यात येत असून पुन्हा नवीन रस्ता त्या ठरावीक ठिकाणी करण्यात येईल. सदर काम हे अंदाजपत्रकानुसार करण्यात येत आहे.
अनिल मोरे, ठेकेदार तळोदा

बातम्या आणखी आहेत...