आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांना गैरसोय:डाबलीजवळ रेल्वेगेटही सुरु ठेवा

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील डाबली येथील सुरत-भुसावळ मार्गावरील रेल्वे गेट क्रमांक ११९येथे पूर्वी पासून २४ तास गेटमन ड्यूटीस होता. मात्र हे गेट बंद करून बोगदा तयार करण्यात आला आहे. मात्र पावसाळ्यात बोगदा पाण्याने भरल्याने नागरिकांना गैरसोय होत आहे.

डाबली गावजवळ सुरत नागपूर रेल्वेमार्ग दरम्यान चालू वर्षात बोगदा तयार केल्यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था बोगद्यातून वळवण्यात आली आहे. तसेच रेल्वे गेट क्र ११९ हे बंद करण्यात आले आहे. परिणामी पहिल्याच पावसात बोगद्यात पूर्णपणे पाणी साचले आहे. यामुळे नरडाणाकडून लगतच्या गावाकडे जाणारा रस्ता बंद आहे. काही लोक रेल्वेरूळ पायी ओलांडून पुढे शेतात जात आहेत. प्रवासी व कामगारांचे हाल होऊ नयेत म्हणून वाहतूक पूर्ववत सुरू राहू देण्याकरिता गेटवरती २४ तास गेटमन ड्यूटीस ठेवून गेट सुरू करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी व गांव विकास संघर्ष समिती डाबली यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...