आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पशुपालकांची चिंता वाढली:लंपीच्या प्रादुर्भावावर लसची मात्रा; 10 लाखांचा प्रस्ताव

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात लंपी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे तातडीने औषधांची खरेदी केली जाणार आहे. त्यानुसार तीन लाख लस घेण्यात येतील. औषधांवर सुमारे १० लाख रुपये खर्च हाेतील, अशी माहिती पशुसंवर्धन सभापती संग्राम पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात दुधाळ जनावरांमध्ये लंपी स्किनचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव जास्त वाढू नये यासाठी उपाययोजना केली जाते आहे. जनावरांचे गोठे व त्याजवळच्या परिसरात कीटक व गोचिड निर्मूलन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच फवारणी करण्याचे आदेश राज्य शासनाने जिल्हा परिषदेला दिले. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन दवाखान्यात येणाऱ्या सेवा शुल्कातून लस खरेदीचा निर्णय झाला आहे. त्यानुसार तीन लाख लस, आयव्हमेटिंग इंजेक्शन ६ लाख, सायपरमेथीन औषध, अँटिसेप्टिक मलम, सोडियम हायड्रोक्लोराइड आदी दहा लाखांची औषध घेण्यात येणार आहे. याविषयीचा प्रस्ताव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे पाठवण्यात आला आहे. तसेच जनजागृतीवर भर देण्यात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन सभापती संग्राम पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेंद्र लंघे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...