आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांनी वाचन वाढवण्यासह नियमित अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करणेही आवश्यक असते, असे मत अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख अकॅडमीचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी केले.
येथील हस्ती पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनिअर काॅलेजमध्ये त्यांचे दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत हाेते. या वेळी राजेश इशी, स्थानिक शालेय सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ.विजय नामजोशी, प्राचार्य हरिकृष्ण निगम उपस्थित होते. प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी आयएएस परीक्षेची तयारी कशी करावी याची माहिती दिली. ते म्हणाले की, आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. शालेय जीवनातील सर्वच विषयांचा अभ्यास बारकाईने व तपशीलवारपणे करावा. प्रत्येक अभ्यासक्रमातील प्रश्न समजून घ्यावे. तसेच स्थानिक व चालू घडामोडींविषयी जाण असणे आवश्यक असते. वर्तमानपत्रांचे वाचन व अभ्यास नियमितपणे करावा. स्पर्धा परीक्षांना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास व धाडस हे गुण अंगी असणे आवश्यक आहे.
जीवनात प्रत्येक बाबतीत सतर्कता, तपस्विता व तत्परता असावी असेही ते म्हणाले. या वेळी प्रा. डॉ. काठोळे इंग्रजी मुळाक्षरांवरून ज्ञानयुक्त आवश्यक माहितीचे संकलन करून अभ्यास कसा करावा, तोंडी मुलाखतीची तयारी कशी करावी याची माहिती दिली. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना कोणत्या पुस्तकांचा वापर करावा, वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, कोणत्या चुका टाळाव्यात याची माहिती त्यांनी दिली. या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे डॉ. काठोळे यांनी निरसन करण्याचा प्रयत्न केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.