आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सोनगीर येथील उम्मीद फाउंडेशनतर्फे राबवला उपक्रम

सोनगीर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील उम्मीद फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृत महोत्सवानिमित्त विविध ठिकाणी ७५ वृक्षांची लागवड करून स्वातंत्र्य दिवस साजरा करून पर्यावरण संवर्धनाचा नारा दिला. या वेळी उम्मीद फाउंडेशनचे पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

येथील उम्मीद फाउंडेशनतर्फे भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ७५ वृक्षाचे रोपण संरक्षण जाळी समवेत गावातील सोमेश्वर मंदिर, आनंदवन हायस्कूल, एन.जी. बागुल हायस्कूल, शहीद भूमी याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. आनंदवन हायस्कूलच्या प्रांगणात आनंदवन संस्थानचे अधिपती डॉ. मुकुंदराज महाराज यांच्या हस्ते एन.जी. बागुल हायस्कूल येथे सुनील बागुल, प्रकाश गुजर, आर.के. माळी, एल. बी. चौधरी, संदीप कासार, अमित बागुल व सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्या हस्ते तर ब. स. शि.प्र. मंडळ व आर्ट-सायन्स कॉलेज येथे अध्यक्ष अमृतजी कासार, सरपंच रुखमाताई मोरे, माजी पंचायत समिती सदस्य अविनाश महाजन, आजी, माजी पदाधिकारी, सोनगीर शहर तसेच शिक्षक व कर्मचारी, सोनगीर पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक चंद्रकांत पाटील, पुरातन सोमेश्वर मंदिर येथे भारतीय सैन्य दलातील जवान भटू माळी व माजी सैनिक नंदकिशोर माळी यांच्या हस्ते, शहीद जवान नीलेश महाजन स्मारक व ग्रामपंचायत आणि कन्या शाळा परिसरात उम्मीद फाउंडेशनचा सर्व टीमच्या हस्ते व श्री समर्थ कृषि सेवा केंद्र येथे भाजपचे शिंदखेडा तालुकाध्यक्ष आर. जी. खैरनार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...