आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष सत्कार:धडगाव महाविद्यालयात एक शाम देश के नाम राबवला उपक्रम

धडगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थी विकास विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ, म. ज. पो. व. कला, वाणिज्य व श्री वि. कृ. कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय धडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाच्या आजादी का अमृत महोत्सव या अभियानांतर्गत एक श्याम देश के नाम हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला.कार्यक्रमाचे उद्घाटन धडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा यांच्या हस्ते झाले.या प्रसंगी माजी सैनिक प्रवीण मनोहर कापडे, फकिरा भुऱ्या पाडवी, कुंडल यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

समाजासाठी विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार संस्थेचे सचिव तथा स्वागताध्यक्ष अरुण वळवी यांच्या हस्ते करण्यात आला. यात स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक डाॅ. भूषण अत्रे, पत्रकार राजू पावरा, सचिन जळोदकर, सागर निकवाडे, विठ्ठल कदम, गोटू पावरा, भूषण मोरे यांचा समावेश होता. नंतर पंचम ऑर्केष्ट्राचे प्रा. डाॅ. राहुल मेघे, सुनीता डोंगरे व सिकंदर भाई देशभक्तीपर गीते सादर केली. अनिल पाडवी या विद्यार्थ्याने देशभक्ती गीतावर नृत्याविष्कार सादर केला. प्रास्ताविक प्राचार्य डाॅ. एच. एम. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डाॅ. व्ही. जी. गोणेकर यांनी केले. प्रा. यु. जी. वळवी यांनी आभार मानले. प्रा. अनिल शिंदे, प्रा. डाॅ. सुनील शिंदे, प्रा. डाॅ. मनोहर पाटील, प्रा. अशोक राठोड, हर्षद पाडवी, प्रा. कल्पना साळवे, खेमसिंग वळवी, रतिलाल पावरा यांनी संयोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...