आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यव्यापी अधिवेशन:भाजप भटके विमुक्त आघाडीच्या अधिवेशनास उपस्थितीचे आवाहन

तळोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे राज्यव्यापी अधिवेशन नागपूर येथे २२ डिसेंबर रोजी होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे अधिवेशन होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भगवत कराड, राष्ट्रीय ओबोसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर, मंत्री अतुलजी सावे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार प्रीतमताई मुंडे, आमदार श्रीकांत भारतीय, भिकुजी विधाते, विश्वास पाठक, अतुल वझे, रामेश्वर नाईक उपस्थित राहून भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त पदाधिकाऱ्यांशी मार्गदर्शन आहेत. या अधिवेशनात भटके विमुक्तांच्या विविध प्रश्नावर विचार विनिमय होणार आहे. युती शासनाच्या व केंद्र शासनाच्या धोरणांची व विविध योजनांची माहिती भटक्या विमुक्तांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना व समाजाला मिळावी. तसेच भारतीय जनता पार्टीचे काम भटक्या विमुक्त समाजात वाढावे यासाठी भटक्या विमुक्तांचे राज्यव्यापी अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशनात उपस्थित राहावे, असे आवाहन श्याम राजपूतांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...