आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भात अपशब्द व असंवैधानिक भाषेचा वापर केल्याने काँग्रेस पक्षाचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी नवापूर तालुका भारतीय जनता पक्षातर्फे निषेध माेर्चा काढून तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
सकाळी ११ वाजता पक्षाचे तालुकाध्यक्ष भरत गावित यांच्या कार्यालयापासून निषेध मोर्चास सुरुवात झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बसस्थानक परिसरात काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या पुतळ्यास चपलांनी मारून त्याचे प्रतीकात्मक दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र सहायक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ, अशोक मोकळ, मनोज पाटील यांनी पुतळा हिसकावून पोलिस गाडीत टाकून पाेलिस ठाण्यात आणला. यानंतर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, २८ रोजी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी संसदेत देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भात राष्ट्रपती एेवजी राष्ट्रपत्नी अशा असंवैधानिक भाषेचा वापर करून राष्ट्रपती मुर्मू व समस्त आदिवासींचा अपमान केला आहे. भाजप या घटनेचा तीव्र जाहीर निषेध करत असून,चाैधरी यांच्यावर कठाेर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून केली.
यावेळी तालुकाध्यक्ष भरत गावित, जि.प. सदस्य संगीता गावित, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, जाकीर पठाण, अजय गावित, नगरसेवक महेंद्र दुसाने, रमला राणा, शहराध्यक्ष प्रणव सोनार, स्वप्निल मिस्तरी, भाजयुमाे तालुकाध्यक्ष दिनेश चौधरी, जितेंद्र अहिरे, हेमंत जाधव, कुणाल दुसाने, जिन्नेशा राणा, दुर्गा वसावे, सुनीता वसावे, पवन दाडवेकर, नीलेश प्रजापत, गोपी सैन, जहूर खान, सजात बदुडा, जैन्या गावित, हर्षल गावित, भीमसिंग पाडवी, भावीन राणा, सौरव भामरे, शंभू सोनार आदी उपस्थित हाेते. यावेळी तालुकाध्यक्ष गावित, संगीता गावित, राजेंद्र गावित यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवला.
शहादा भाजपतर्फे अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन शहर भाजप मार्फत काँग्रेसचे लोकसभा गटनेते अधीर रंजन चौधरी यांच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. गटनेते चौधरी यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भात असंवैधानिक व अशोभनीय भाषेचा वापर केल्यामुळे काँग्रेस पक्षाचा व चौधरी यांचा धिक्कार करण्यात आला.
प्रांताधिकारी कार्यालयासमोर अधीर रंजन यांच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष कल्पना पंड्या, शहराध्यक्ष विनोद जैन यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यावेळी आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत वसावे, ओबीसी जिल्हाध्यक्ष अनामिका चौधरी, महिला उपाध्यक्ष नंदा सोनवणे, डॉ.योगेश चौधरी, शहर उपाध्यक्ष पंकज सोनार, अक्षय अमृतकर, महामंत्री हितेंद्र वर्मा, वैभव सोनार, युवा अध्यक्ष राजीव देसाई, सचिव प्रशांत कदम, जितेंद्र शिकलीकर आदी उपस्थित हाेते.
अक्कलकुवा | आदिवासी समाजाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी असंवैधानिक वक्तव्य केल्याने अक्कलकुवा भाजपतर्फे निषेध नोंदवून तहसीलदार सचिन मस्के यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी, सरपंच जयमल पाडवी, तालुका उपाध्यक्ष भूपेंद्र पाडवी, युवा मोर्चाचे वैभव पाडवी, हिरालाल वळवी, रमेश माकत्या वसावे, अमृत रमेश पाडवी, दारासिंग पाडवी आदींसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.