आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदखेडा तालुक्यातील वाघाडी खुर्द जवळ सोनगीर अमळनेर रस्त्यालगत असलेल्या घरात एका वृद्ध महिलेचा (ता १) बुधवारी मृतदेह आढळून आला असून नरडाणा पोलिसांत नोंद झाली आहे. गावापासून पाचशे मीटर अंतरावर प्लॉटिंग असलेल्या सुनसान जागेत बांधलेल्या घरात ही घटना घडली आहे.
मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या संध्या हेमंत शहा (जैन) वय ६७ ही वृद्धमहिला गेल्या एक वर्षापासून वाघाडी गावाजवळील (प्लॉटींग) नवीन घर बांधून वास्तव्यात राहायला आली होती. ह्या परिसरात लोकवस्ती नसल्यामुळे एकमेव घर या महिलेचे होते. ह्या महिलेचे पती मुंबई येथे एका कंपनीत कामाला होते. कोरोन काळात त्याचा मृत्यू झाला. महिलेला दोन मुलं आहेत.
मोठा मुलगा अमोल हेमंत जैन हा नाशिक येते राहत असून व्यवसाय करतो तर लहान मुलगा धवल हेमंत जैन हा अमेरिकेला नोकरीला असून २६ मे रोजीच मुंबईला आपल्या घरी परतला असल्याची माहिती मृत महिलेच्या मुलाने दिली. दोन दिवसांआधी नाशिक येथे असलेला त्याचा मुलगा अमोल याला सायंकाळी त्याचा मृत आईचा विडिओ कॉल आला पण तो उचलण्या आधीच बंद झाला.ही गोष्ट मूलाचा लक्षात आल्या नंतर त्याने आईला फोन लावत होता.मात्र आई जवळ असलेल्या दोन मोबाईल पैकी एक मोबाईल बंद येत होता तर एक वर रिंग जात असून देखील आई फोन उचलत नसल्याने ता १ जून रोजी बुधवारी तो आईला भेटण्यासामसाठी सकाळी नाशिक येथून निघाला असता ११.३० वाजता तो घरी पोहचला असता आईचा रक्ताने भरलेला मृतदेह दिसला. अप्पर अधीक्षक प्रशांत बच्छाव ,पोलीस विभागीय अधिकारी अधिकारी अनिल माने , सहायक पोलिस निरीक्षक मनोज ठाकरे,उप निरीक्षक मनोज कुवर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.