आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेक फेल जखमी:ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित जीप उलटली; 4 गंभीर जखमी

तळोदा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रेक फेल झाल्याने पीकअप जीप उलटून झालेल्या अपघातात चाैघे जण जखमी झाले. धडगाव येथून खते व बी-बियाणे भरून तळोद्याकडे येताना तोलाचापड फाट्याजवळ शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात जखमी झालेल्या चाैघांना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महिंद्रा पीकअप जीप (क्र. एमएस ३९ एडी १३५४) तळोदा जाण्यासाठी निघाली. खडतर असा चांदसैली घाट उतरल्यानंतर कोठारच्या पुढे गाडीचे ब्रेक निकामी झाल्याचा संशय गाडी चालक अजय भीमसिंग पाडवी यास आला. त्यामुळे गाडीचे नियंत्रण सांभाळणे त्यास जिकिरीचे झाले. तोलाचापड फाट्याजवळील वळणावर गाडी आली असता अखेर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती वळणावर पलटी झाली.

भरधाव वेगात असणारी गाडी पलटल्याने ती त्या ठिकाणी असणाऱ्या छोट्या पुलाच्या खाली जाऊन कोसळली. या अपघातात चालक अजय पाडवीसह सावन तडवी, रा. मुंदलवड, ता.धडगाव, राकेश फेगा वडली (वय २५) रा.कालिबेल, ता. धडगाव, सायली राकेश वडली (वय २३), ज्योती रफेगा वळवी (वय २०) हे चाैघे जखमी झाले. अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी तसेच अंबागवान फाट्याजवळ उभ्या असलेल्या नागरिकांनी जखमींना तत्काळ मदत केली. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला पाचारण करून त्याद्वारे चालक कल्पेश पावरा व डॉ.चेतन पावरा यांनी तळाेदा येथे प्रथमोपचार केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...