आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:शहरात आज होणार बेराेजगार मेळावा

धुळे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील बेराेजगार युवकांसाठी आमदार फारुख शाह यांच्यातर्फे उद्या साेमवारी (दि.१२) सकाळी ११ वाजता शंभर फुटी राेडवरील मारिया हाॅलमध्ये बेराेजगार मेळावा होणार आहे.जिल्ह्यात धुळे एमआयडीसी सोडून कोणत्याही ठिकाणी रोजगाराची संधी नाही. त्यामुळे जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली आहे. रोजगार नसल्याने युवक वाम मार्गाला लागत असून व्यसनाधीन होता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार फारुख शाह यांनी रावेर येथे एमआयडीसी व्हावी यासाठी प्रयत्न चालवले आहे.

तसेच बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी उद्योजक, आस्थापनांना एकत्रित करून सुशिक्षित बेरोजगारांसाठी मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हा मेळावा जिल्हा कौशल्य विकास रोजगार, मार्गदर्शन केंद्राच्या सहकार्याने सोमवारी होणार आहे. मेळाव्यात २० कंपन्या सहभागी होणार आहे. सुमारे २ हजार पदांसाठी मुलाखती घेण्यात येतील. तसेच निवड झालेल्या उमदेवारांना त्याच ठिकाणी नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. मेळाव्याला उपस्थित सुशिक्षित बेरोजगारांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच त्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यता येईल, अशी माहिती आमदार फारुख शाह यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...