आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्यांचे हात घ्यावे’ या वि. दा. करंदीकरांच्या काव्याप्रमाणे धुळे तालुक्यातील सोनगीर येथील आनंदा धनगर यांचा हात मृत्यू पश्चात केरळमधील एका गरजूला प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून बसवण्यात आला. सूरत येथे उपचार सुरू असलेल्या धनगर यांच्यावर चाळीस मिनिटांच्या शस्त्रक्रिया केल्यावर त्यांचा हात शरीरापासून वेगळा करून सूरत रुग्णालय ते विमानतळापर्यंत नेण्यासाठी ग्रीन कॉरीडॉर केले होते. त्यासाठी २० मिनिटे वाहतूक थांबवण्यात आली. त्यानंतर विमानाने सुमारे १२०० किमी अंतरावरील कोची येथे रिट्रायव्हल सर्जरीने आनंद यांचा हात एका गरजूवर प्रत्यारोपण करून बसवण्यात आला. हात दानाची ही भारतातील २३ वी तर महाराष्ट्रातील पहिली घटना आहे.
इन्ट्रावेन्टिक्युअर हॅमरेज झाल्याने सूरत शासकीय रुग्णालयात आनंद धनगर यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले. त्यानंतर धनगर यांच्या कुटूंबियांना डॉक्टरांनी अवयवदानाची माहिती दिली. या वेळी आनंद धनगर यांचा मुलगा विनोदने वडिलांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. केरळमधील कोची येथील एका गरजूला हाताची गरज होती. मृत आनंद व कोचीमधील ज्या रूग्णाला हाताची गरज होती त्या रुग्णाचा रक्तगट, पेशी मॅच झाल्या. त्यानंतर रिट्रायव्हल सर्जरीसाठी केरळहून डॉ. संजू सॅम्युएल व अन्य दोन प्लास्टिक सर्जन सूरतला आले. त्यांनी ४० मिनिटांची शस्त्रक्रिया करून धनगर यांच्या शरीरापासून त्यांचा हात वेगळा केला.
टिम वर्कमुळे शक्य ^६ तासांत हाताचे रोपण गरजेचे होते. तसे कुंटूंबियांना सांगण्यात आले. मृत आनंद यांचा मुलगा विनोद अवयवदानासाठी तयार झाला. त्यानंतर शस्त्रक्रीया झाली. ग्रीन कॉरीडॉर व एअर अॅब्म्युलन्सने हाताचे यशस्वी रोपण झाले. धनगर कुटूंबियांचा हा आदर्श कौतुकास्पद आहे. - डॉ. केतन नायक, निवासी वैद्यकीय अधिकारी, सूरत रुग्णालय
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.