आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामकाजावर‎ बहिष्कार टाकत सभात्याग:अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आंदाेलन‎

धुळे‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या‎ मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अामदार‎ कुणाल पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी‎ काँग्रेसच्या अामदारांनी कामकाजावर‎ बहिष्कार टाकत सभात्याग करून विधान‎ भवनाच्या पायऱ्यांवर आंदाेलन केले.‎ अामदार कुणाल पाटील यांनी तारांकित‎ प्रश्नाद्वारे याविषयाकडे लक्ष वेधले.‎ अधिवेशनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या‎ मागण्यांवर चर्चा सुरू हाेती. त्या वेळी‎ मंत्र्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.‎ त्यामुळे अामदार पाटील व अन्य‎ आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर‎ उभे राहत घाेषणाबाजी केली.

अंगणवाडी‎ कर्मचाऱ्यांना किमान समान कार्यक्रमानुसार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ किमान वेतन श्रेणीतील शिफारसीनुसार १८‎ हजार वेतन दरमहा द्यावे, कर्मचाऱ्यांना‎ तृतीय किंवा चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा,‎ त्यांना भत्ते द्यावे, काेराेना काळात काम‎ केल्याने शासनाने कर्मचाऱ्यांना प्राेत्साहन‎ भत्ता देण्याचे जाहीर केले होते. हा भत्ता‎ द्यावा, न्यायालयाच्या निर्णयानुसार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ग्रॅच्युइटीची अंमलबजावणी करावी, अशी‎ मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली.‎ दरम्यान, अंगणवाडी कृती समितीने विविध‎ मागण्यांसाठी अाझाद मैदानावर सुरू‎ केलेल्या आंदाेलनाला अामदार पाटील‎ यांनी पाठिंबा दिला असल्याची माहिती‎ आमदार पाटील यांनी दिली.‎

बातम्या आणखी आहेत...