आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी‎:अंगणवाडीसेविकेची आत्महत्या;‎ मोर्चा काढून कारवाईची मागणी‎

धडगाव‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील हिरणीचापाडा येथील‎ अंगणवाडी सेविका‎ आत्महत्येप्रकरणी धडगाव तालुका‎ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा पोलिस‎ अधीक्षक कार्यालयावर मोर्चा‎ काढून संबंधितांवर कारवाईची‎ मागणी करण्यात आली. दरम्यान,‎ जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.‎ पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी‎ करून दोषींवर कडक कारवाई‎ करण्याचे आश्वासन दिले.‎ अंगणवाडी सेविका अलका‎ वळवी धडगाव तालुक्यातील‎ तोरणमाळ विभागातील जुगणीच्या‎ हिरणीचापाडा येथील रहिवासी‎ केंद्रात अंगणवाडी सेविका म्हणून‎ कार्यरत होती. तीन वर्षांपासून तिला‎ कामाचा कोणताही मोबदला‎ मिळाला नव्हता. तसेच संबंधित‎ विभागाच्या अधिकाऱ्यांकडून‎ मानसिक त्रास दिला जात होता.

या‎ प्रकरणी पाच जणांविरुद्ध म्हसावद‎ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल‎ करण्यात आला. पंधरा दिवसांपासून‎ पोलिसांनी आरोपींना पाठीशी‎ घालत अटक करून कायदेशीर‎ कारवाई केलेली नाही. आरोपींना‎ पोलिसांनी अटक करून कायदेशीर‎ कारवाई करावी, अशी मागणी‎ नातेवाइकांकडून केली जात होते.‎ त्यामुळे गुरुवारी नातेवाईकांना थेट‎ नंदुरबार पोलिस अधीक्षक‎ कार्यालय गाठून मोर्चा काढत‎ निवेदन सादर केले आहे. .‎ कायदेशीर कारवाई न केल्यास तीव्र‎ आंदोलन करण्याचा इशारा‎ राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राहून‎ पावरा यांनी दिला.‎

बातम्या आणखी आहेत...