आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धापन दिन:शिरपूर बसस्थानकात वर्धापन दिन कार्यक्रम ; वाहकांच्या हाताने केक कापून उत्साहात साजरा

शिरपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सर्वसामान्य जनतेसाठी सुरू करण्यात आलेल्या बससेवेला ७४ वर्षे पूर्ण झाले असून “लालपरी”ने अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल बसस्थानकात बुधवारी आगार व्यवस्थापक, कर्मचारी व प्रवासी यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धापनदिन चालक आणि वाहकांच्या हाताने केक कापून उत्साहात साजरा केला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १ जून १९४८ रोजी जनतेच्या सेवेसाठी बससेवा सुरू करण्यात आली. सेवेस ७४ वर्षे पूर्ण झाले. चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न केला. तसेच वयोवृद्ध, अपंगांसाठी सवलतीच्या दरात प्रवासाची सोय केली. अल्पावधीत जनतेसाठी “लालपरी” झाली. तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी बसची सेवा सुरू झाली. प्रवाशांच्या हाताने फीत कापण्यात आली. स्वागत गुलाबपुष्प व पेढे देऊन वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी बसस्थानकात रांगोळी काढून नियंत्रण कक्ष तसेच बसस्थानकात सजावट करण्यात आली होती. या वेळी आगारप्रमुख वर्षा, पावरा, मनोज पाटील, प्रीती पाटील, अनिल मोरे, बी.जी. तीरमले, आर. आर. तेली, आर. एच. मोरे, अशफाक शेख, अशोक बडगुजर, नाझिम शेख, अनिल पाटील, ए.पी. पाटील, यू. एस. नव्हलदे, जे.एम. धनगर, हेमंत शिंपी, उमेश ओगले, वाय. आर. धनगर, वंदना खैरनार, जितेंद्र शेटे, नितीन हडप उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...