आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन:आकाशवाणी केंद्रामध्ये केले जबाब दो आंदाेलन

धुळे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आकाशवाणी केंद्रावर स्थानिक कलाकारांना काम देणे बंद करण्यात आले आहे. धुळे केंद्रावरून विविध भारतीचे कार्यक्रम प्रसारित हाेत आहेत.या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज थेट आकाशवाणी केंद्र गाठीत जबाब दाे आंदाेलन करण्यात आले. आकाशवाणी केंद्राकडून स्थानिक कलावंतांना कामे देणे बंद करून मराठी अस्मिता पाेसण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आराेप करण्यात आला आहे.

याबाबत केंद्रातील अधिकाऱ्यांवर प्रश्नाचा भडीमार करीत त्यांना जाब विचारण्यात आला. याबाबत ठाेस निर्णय न झाल्यास तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. मनसेच्या महिला आघाडीच्या प्रदेश सचिव प्राची कुळकर्णी, महानगराध्यक्ष संजय साेनवणे, शहरप्रमुख हर्षल परदेशी, अॅड.प्रसाद देशमुख, रविराज जाेशी, उज्वल दादाभाई, विजय गुरूबा आदींने आकाशवाणी केंद्र गाठीत तेथील अधिकारी संताेष लाेथे यांची भेट घेतली.

त्यांच्याशी याप्रकरणी चर्चा करीत धुळे आकाशवाणी केंद्र असतानंा तेथून दुसऱ्या कार्यक्रमाचे प्रसारण का करण्यात येते. केंद्रावरून केवळ सध्या गाणीच प्रसारीत हाेतात. एकूण मराठी कलावंतांना संपवण्यासाठी काही सूचना वरून मिळाल्या आहेे काय अशी विचार जबाब दाे आंदाेलनातून करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...