आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांचे आयोजन:नवमतदारांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन‎; जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली माहिती ‎

नंदुरबार‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत निवडणूक आयोगाच्या‎ आदेशानुसार १ जानेवारी या अर्हता‎ दिनांकावर आधारित छायाचित्रासह‎ मतदार यादीचा विशेष संक्षिप्त‎ पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात‎ आला आहे. भारत निवडणूक‎ आयोगाच्या सूचनेनुसार मतदार‎ नोंदणी नियमा मध्ये सुधारणा आता‎ दरवर्षी दिनांकावर १ जानेवारी, १‎ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर या‎ अर्हता दिनांकावर नोंदणीसाठी पात्र‎ असलेले अर्जदार आगाऊ अर्ज‎ सादर करू शकतील. या मोहिमेत‎ जास्तीत जास्त नवमतदारांनी‎ आपले नावे नोंदवावीत, असे‎ आवाहन जिल्हाधिकारी तथा‎ जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा‎ खत्री यांनी केले आहे.‎ मतदार यादी पूर्व- पुनरीक्षण‎ कार्यक्रम असा: बुधवार ९ नोव्हेंबर‎ पासून एकत्रीकृत प्रारूप मतदारयादी‎ प्रसिद्ध करुन ९ नोव्हेंबर ते गुरुवार ८‎ डिसेंबर या कालावधीत‎ नागरिकांकडून दावे व हरकती‎ म्हणजेच नागरिकांकडून मतदार‎ नोंदणीचे, मतदार यादीतील नोंदीच्या‎ दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज‎ मागवण्यात येणार आहेत. तसेच‎ विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात‎ विशेष शिबिराचे आयोजन करण्यात‎ येणार आहे.

महाविद्यालयातील‎ निवडणूक साक्षरता मंडळाच्या‎ नोडल शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे‎ सहकार्य घेण्यात येईल. या शिबिरात‎ महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून‎ १८ वर्ष पूर्ण झालेल्या; परंतु मतदार‎ नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांची यादी‎ घेण्यात येईल व सदर शिबिरामध्ये‎ विद्यार्थ्यांकडून नमुना-६ भरून‎ घेण्यात येईल. शनिवार १२ नोव्हेंबर‎ व रविवार १३ नोव्हेंबर रोजी मतदान‎ केंद्रावर महिला, दिव्यांग यांच्या‎ मतदान नोंदणीसाठी तसेच शनिवार‎ २६ व २७ नोव्हेंबर या दिवशी मतदान‎ केंद्रावर तृतीयपंथी व्यक्ती, देहविक्री‎ करणाऱ्या महिला आणि घर‎ नसलेल्या भटक्या व विमुक्त‎ जमातीच्या व्यक्ती यांच्या मतदान‎ नोंदणीसाठी विशेष शिबिराचे‎ आयोजन करण्यात येणार आहे.

२६‎ डिसेंबर रोजी दावे व हरकती‎ निकालात काढण्यात येतील. तर ३‎ जानेवारी २०२३ पर्यंत अंतिम‎ प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी‎ मागणे व डाटाबेस अद्ययावत करणे‎ आणि पुरवणी याद्याची छपाई‎ करण्यात येऊन ५जानेवारी २०२३‎ रोजी मतदार यादीची अंतिम यादी‎ प्रसिद्ध करण्यात येईल. तरी नागरिक‎ व नवमतदारांनी मतदान नोंदणी,‎ दुरुस्ती व वेळीच अर्ज भरावे, असे‎ आवाहन करण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...