आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:शिरपूरला गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप; 52 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

शिरपूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीच्या परीक्षेत येथील आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्टच्या विविध संस्थेतील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. संस्थेतील १ हजार ६०७ विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संस्थेचा निकाल १०० टक्के लागला. संस्थेतील १८९ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले. संस्थेचे १ हजार ५५५ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह, ५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

संस्थेच्या मेन बिल्डिंगमधील राजगोपाल भंडारी हॉलमध्ये माजी उपनगराध्यक्ष भूपेश पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिरपूर शहरातील एच.आर. पटेल कन्या विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील अनम रफिक शेखने ९५.१७ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात विज्ञान विभागात प्रथम तर शिरपूर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. तिचाही सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकर चव्हाण, संचालक बबनलाल अग्रवाल, फिरोज काझी, जाकीर शेख, सीईओ डॉ. उमेश शर्मा, शिरपूर पीपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी, राजू शेख, फार्मसीचे प्राचार्य डॉ.एस.जे. सुराणा, आयएमआरडीच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील, प्राचार्य आर. बी. पाटील, प्रा. डॉ. सुहास शुक्ल, प्राचार्य आर.एन. पवार, प्राचार्य व्ही. आर. सुतार, प्राचार्य आर.एफ. शिरसाठ, प्राचार्य सचिन पाटील, अमोल परब, प्राचार्य एच.के. कोळी, पी.आर. साळुंखे, प्राचार्य मुबीन शेख आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...