आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Dhule
  • Applause On The Backs Of Meritorious Students Who Have Achieved Success In Class XII Examinations; One Hundred Marks Out Of 100 In Sanskrit Subject By 14 Students |marathi News

गौरव:बारावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप; 14 विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात 100 पैकी शंभर गुण

धुळे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील धुळे एज्युकेशन सोसायटीचे जो. रा. सिटी हायस्कूल व डी.एम. बारी कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९८.५३ टक्के लागला. महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात १०० पैकी शंभर गुण प्राप्त केले. गुणवंतांचा संस्थेचे अध्यक्ष रवी बेलपाठक, मानद सचिव संतोष अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी उपाध्यक्ष डॉ. महेश घुगरी, कोषाध्यक्ष डॉ. मंदार म्हस्कर, प्राचार्य अनारसिंग पावरा, उपप्राचार्य आर.जे. गुजराथी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. व्ही. आर. अमृतकर यांनी केले. प्रा. रूपाली नांदेडकर यांनी संयोजन केले.

बातम्या आणखी आहेत...