आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छाननी:शिरपूर तालुक्यात दोन उमेदवारांचे अर्ज अवैध

शिरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी दाखल अर्जांची सोमवारी छाननी झाली. सदस्यपदाच्या दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. सरपंचपदासाठी १२१ तर सदस्यपदासाठी ६६० असे एकूण ७८० अर्ज वैध ठरवण्यात आले आहे.

उमेदवारी अर्ज वैध ठरला का अवैध याची माहिती घेण्यासाठी तहसील कार्यालयात उमेदवार व समर्थकांनी गर्दी झाली होती. आता उमेदवारी माघारीकडे सर्वांचे लक्ष आहे. हाडाखेड येथील अकाला जिभाऊ पावरा यांचा सदस्यपदासाठी दाखल केलेला अर्ज शैक्षणिक कारणामुळे तर बोराडी येथील ममता कालू सिंग पावरा यांचा अर्ज अपूर्ण असल्याने बाद झाल्याची माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...