आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:महिला आयोगावर नवीन अध्यक्षांची नियुक्ती करा

साक्री14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य महिला आयोगाची वाटचाल पक्षपाती व राजकारण प्रेरित कार्यपद्धतीने होते आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या ऐवजी निःपक्षपाती पणे काम करणाऱ्या महिलेची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा नगगरसेविका अॅड. पूनम शिंदे-काकुस्ते यांनी केली आहे. याविषयी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्ष आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिफारशीवरून त्यांची राजकीय उद्देशाने महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. महिला आयोग राजकीय आयोग नसून तो प्रशासनिक आहे. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात निःपक्षपाती बुद्धीने काम केले पाहीजे. पण सद्य:स्थितीत तसे होत नसल्याचे चित्र आहे. खासदार नवनीत राणा, अभिनेत्री केतकी चितळे प्रकरणाची महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दखल घेण्याची गरज होती. पण तसे झाले नाही. हा प्रकार महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा अवमान आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निःपक्षपाती पणे व कर्तव्य पारायणतेने काम करणाऱ्या महिलेची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी साक्रीच्या नगराध्यक्षा जयश्री पवार, पाणीपुरवठा समिती सभापती रेखा सोनवणे, बालकल्याण समिती सभापती जयश्री पगारिया आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...