आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शिंदखेड्यातील 51 शिक्षकांना कृतज्ञता पुरस्कार

शिंदखेडा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील गांधी चौकातील अष्टविनायक गणेश मित्र मंडळातर्फे गेल्या ४० वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होतो आहे. मंडळातर्फे सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबवण्यात येतात. त्यानुसार यंदा शिक्षक दिनाचे औचित्य साधून शहरातील ५१ शिक्षकांना आदर्श शिक्षक कृतज्ञता पुरस्कार देण्यात आला. यंदा मंडळाने कैलास पर्वतावर शंकर महादेवाचे अवतरण आणि पिंडीवर जलाभिषेक असा देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी गर्दी होते आहे.

मंडळ अध्यक्ष हर्षल देसले यांनी सांगितले की, मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम होतात. तसेच आकर्षक विद्युत रोषणाई व देखावे सादर केले जातात. यंदा कैलास पर्वतावर शंकर महादेवाचे अवतरण आणि पिंडीवर जलाभिषेक हा देखावा साकारण्यात आला आहे. नगराध्यक्षा रजनी वानखेडे व गटनेते अनिल वानखेडे यांच्या हस्ते महाआरती झाली. या वेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासह क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतिसूर्य महात्मा जाेतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मंडळाचे सचिव तथा नगरसेवक अरुण देसले यांनी अष्टविनायक गणेश मित्र मंडळाची पार्श्वभूमीवर सांगितली. पोलिस निरीक्षक सुनील भाबड, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, नगरसेवक उदय देसले, अरुण देसले, सूरज देसले, केंद्रप्रमुख जगदीश पाटील, अशोकराव देसले उपस्थित होते. कैलास अहिरराव, अजय बोरदे, हर्षल कापुरे, कल्पना परदेशी, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, अनिल वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले.

यांचा झाला सत्कार
कार्यक्रमात आदर्श शिक्षक म्हणून शिक्षिका एस. एस. बैसाणे, अजय बोरदे, संजयकुमार महाजन, कल्पना परदेशी, कैलास अहिरराव, विनोद महाले, योगिता संदीप पाटील, मयूरेश अग्रवाल, हर्षल भामरे, योगेश देसले, साहेबराव जाधव आदींचा सत्कार झाला. यशस्वितेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष आनंद बाजीराव देसले, सचिव अरुण देसले, खजिनदार विनोद देसले, नरेंद्र देसले, पंकज कौठळकर, चेतन देसले, राकेश देसले, स्वप्निल देसले आदींनी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...