आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण:आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकांचा गौरव

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेतर्फे सोमवारी आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषद सभागृहात अध्यक्ष तुषार रंधे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या समारंभास व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुसुम निकम, शिक्षण सभापती मंगला पाटील, महिला व बालकल्याण सभापती धरती देवरे, समाज कल्याण सभापती मोगरा पाडवी, कृषी सभापती संग्राम पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ. मंजुषा क्षीरसागर, माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत भदाणे होते. मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. देवयानी वाघ यांनी केले.

पुरस्कारार्थी शिक्षक
संगीता सीताराम पाटील(अनकवाडी,ता.धुळे),सुषमा रमेश भामरे (उंभरे,ता.साक्री), किरण देवीदास पाटील (बभळाज,ता.शिरपूर), कैलास गोविंद वाघ (खलाणे,ता. शिंदखेडा) या शिक्षकांचा जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरवले.

बातम्या आणखी आहेत...